“पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील”

0
162

मुंबई : राजकीयदृष्ट्या कमालीचे जागरुक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे दुसरे पंतप्रधान देशाच्या इतिहासात झाले नसतील. याबद्दल त्यांचे कौतुक करावं तेवढं थोडंच, असा टोला शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून नरेंद्र मोदींना लगावला आहे.

पश्चिम बंगाल आणि बांगलादेशची भाषा एकच आहे. बांगलादेशात राहणाऱ्यांची नातीगोती पश्चिम बंगालात मोठ्या प्रमाणावर आहेत. इंदिरा गांधींच्या शौर्यामुळे, पराक्रमामुळे बांगलादेशची निर्मिती झाली. इंदिरा गांधी यांनी युद्ध पुकारून पाकिस्तानची सरळ फाळणीच केली. त्यानंतर असे शौर्य कोणत्याही पंतप्रधानांना गाजवता आले नाही, असंही सामना अग्रलेखात म्हटलं.

दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्य लढय़ात किंवा गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून ताम्रपट आणि पेन्शन मिळते. या सुविधा बांगलादेश स्वातंत्र्य लढय़ातील मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात. बांगलादेश स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिक म्हणून मोदी यांना गौरवाचा ताम्रपट मिळायला हवा, असा टोमणाही सामनातून नरेंद्र मोदींना लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘सचिन वाझेंमुळे सरकार अडचणीत येईल, हे मी आधीच सांगितलेलं; संजय राऊतांचं मोठं वक्तव्य

“राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनला विरोध”

“…तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल”

भाजप नेत्यांकडून मदती ऐवजी फक्त राजकारण केलं जातय- किशोरी पेडणेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here