“…तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल”

0
182

मुंबई : मी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालो होतो, असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. या विधानामुळे मोदींचा 2 दिवसीय बांगलादेश दौराही चांगलाच चर्चेत राहिला. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपल्या देशाच्या पंतप्रधानांवर आपला विश्वास असायलाच हवा ! मात्र आपले पंतप्रधान बांगलादेश मुक्तीच्या लढ्यात नक्की कधी अटक झाले, त्यांना कोणते पोलीस स्टेशन किंवा जेलमध्ये ठेवले होते याची माहिती त्यांनी दिली तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल., असं ट्विट करत जयंत पाटलांनी मोदींना टोमणा लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजप नेत्यांकडून मदती ऐवजी फक्त राजकारण केलं जातय- किशोरी पेडणेकर

नाईट लाईफ लोकांची नसते, ती तुमची असते; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर, मृत वाघापेक्षा जखमी अधिक खतरनाक- ममता बॅनर्जी

अमित शहा-शरद पवारांच्या भेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here