कराड : पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या कराडच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूकची निकाल जाहीर झाला आहे.
काँग्रेस नेते आणि सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का देत डॉ. अतुल भोसलेंच्या सहकार पॅनेलने विजय मिळवला आहे. डॉ.अतुल भोसले यांच्या जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सर्व 21 जागावर दहा हजारांच्या मताधिक्यानं मोठा विजय मिळवला आहे.
दरम्यान, विश्वजीत कदम यांनी इंद्रजीत मोहिते यांच्या रयत पॅनेलला पाठिंबा जाहीर केल्यानं सर्वत्र एकच चर्चा चालू झाली होती. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची लढत तिरंगी असल्यानं मतदारांमध्ये चुरस निर्माण झाली होती. मात्र डॉ. अतुल भोसले यांच्या या दणदणीत विजयानंतर मोठा जल्लोष साजरा केला जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“घरगुती गॅस, इंधन दरवाढ, महागाई विरोधात राष्ट्रवादीचं 2 दिवस राज्यव्यापी आंदोलन”
“मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर म्हणून राज्याने स्वस्थ बसू नये”
“मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा फटका, मोदी सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली”
“जाती फोडून झाल्या, आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू”