मुंबई : केंद्रसरकारने वाढवलेल्या घरगुती गॅसच्या किंमती, इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज आणि उद्या राज्यभर आंदोलन पुकारल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
सर्वसामान्यांच्या स्वैंपाकासाठी आवश्यक घरगुती गॅस सिलिंडरची किंमत केंद्र सरकारने २५ रुपयांनी वाढवली. सततच्या इंधन दरवाढीमुळे गृहिणींचं बजेट कोलमडलंय. पक्षातर्फे उद्या व परवा प्रत्येक तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन छेडले जाणार आहे.

– @Jayant_R_Patil pic.twitter.com/VQVh7Q4tdF— NCP (@NCPspeaks) July 1, 2021
दरम्यान, जगावं की मरावं असा प्रश्न हॅम्लेटच्या नाटकात विचारला होता. मोदींच्या केंद्रसरकारमुळे वाढलेल्या महागाईनं व इंधन दरवाढीनं सर्वसामान्यांचे व गृहिणींचे बजेट कोलमडून पडलं आहे. जगावं की मरावं या प्रश्नाचे उत्तर ‘मन की बात’ मध्ये दिसते त्यावेळी ते ‘मरावंच’ असं दिसत असल्याचा टोला जयंत पाटलांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
“मराठा आरक्षणाची जबाबदारी केंद्रावर म्हणून राज्याने स्वस्थ बसू नये”
“मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचा फटका, मोदी सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली”
“जाती फोडून झाल्या, आता गाड्या फोडून पंतप्रधान होण्याचा प्रयत्न सुरू”
“अमित शहांच्या मुलाची प्रॉपर्टी 10 पटींनी वाढली, ईडी त्यांची चौकशी करणार नाही”