Home महाराष्ट्र “पडळकरांची आमदारकी पवारांवर टीका करण्यासाठी, त्यांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली काय...

“पडळकरांची आमदारकी पवारांवर टीका करण्यासाठी, त्यांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली काय लेव्हल राहील”

मुंबई : सोलापुरमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना काल घडली होती. या घटनेवर प्रतिक्रिया देत पडळकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर खालच्या शब्दात टीका केली होती.

मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी प्रधानमंत्री आहेत, त्यांना भावी प्रधानमंत्रीपदासाठी शुभेच्छा. रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, त्यामुळं पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी अपेक्षा, असा टोला पडळकरांनी लगावला होता. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.

पडळकर यांनी जे वक्तव्य केलंय ते कोणत्याही महिलेला विचाराल तर सांगतील की चुकीची गोष्ट आहे. एखाद्या मोठ्या नेत्यावर कुणी असं वक्तव्य करत असेल तर एखाद्या युवकाला ते चुकीचं वाटलं असेल, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.

सोलापुरात त्या युवकाने जे केलं ते चुकीचं आहे. ही आपली संस्कृती नाही. मात्र, त्यामागील विचारही समजून घेणं महत्वाचं आहे. जे भाजप नेते पडळकरांना प्रोत्साहन देत आहेत, त्यांनी सांगावं की जे वक्तव्य पडळकरांनी केलं ते योग्य आहे का? महाराष्ट्राच्या संस्कृतीला हे शोभतं का? असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला.

दरम्यान, पडळकरांना जी आमदारकी दिली गेलीय ती फक्त पवारांवर टीका करण्यासाठी देण्यात आलीय. पडळकर अशी टीका करतात की त्याचं उत्तरही देता येत नाही. कारण त्यांच्या टीकेचं उत्तर दिलं तर आपली लेव्हल काय राहिल, असा उपरोधक टोलाही रोहित पवारांनी पडळकरांना लगावला. तसेच दोन दगडं एकमेकांवर आदळली तर आगच पेटेल, त्यापेक्षा न बोललेलं बरं, असंही रोहित पवारांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व, पडळकरांनी त्यांच्याविषयी बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्ये खपवून घेणार नाही”

कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होणार- महादेव जानकर

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; गोपीचंद पडळकर आक्रमक

“संभाजी भिडे चुकीची वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा”