कोल्हापूर : मी एक ना एक दिवस पंतप्रधान जरुर होईन. त्यासाठी मला कुणाचीही मदत घ्यावी लागली, कुणाचाही आधार घ्यावा लागला तर ती घेईन. पण मी पंतप्रधान होणारच, असं वक्तव्य राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलं.
मी कुणाचा गुलाम म्हणून फिरत नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचं अंतिम ध्येय दिल्ली आहे. त्यामुळे कोणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान जरुर होईन, असा दावा महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केला. ते कोल्हापूरात माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचा रस्ता डांबरीकरणाचा आहे, तर भाजपचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे. मी मात्र पाणंदीने पुढे चाललो आहे. माझाही सूर्य कधी तरी उगवेल अशी देखील आशा महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केली.
महत्वाच्या घडामोडी –
‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; गोपीचंद पडळकर आक्रमक
“संभाजी भिडे चुकीची वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा”
“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”
विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये- संजय राऊत