सोलापूर : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर गोपीचंद पडळकर चांगलेच आक्रमक झालेत. आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे.
माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हलली आहे. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आली आहे. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहलं आहे. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. अजित पवारांनी आरक्षण घालवलं. ओबीसींचं आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं. बहुजनांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पडळकर म्हणाले आहेत.
दरम्यान, मी शरद पवारांवर काय टीका केली होती… मग मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?, असा सवालही पडळकरांनी उपस्थित केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“संभाजी भिडे चुकीची वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा”
“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”
विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये- संजय राऊत
“अजित पवार आता तुम्हाला कोणी वाचू शकत नाही, तुम्ही जेवढी मस्ती केली ती या आयुष्यातच भरावी लागणार”