मुंबई : कोरोना संसर्गामुळे यंदाही आषाढी वारीवर राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. तर दुसरीकडे आषाढी एकादशीला पायी वारीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावर आता कारवाईची मागणी होत आहे.
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे वारंवार चुकीची वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. आम्ही त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. असं रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना आम्ही विनंती करत आहे की, त्यांनी सरकारच्या वतीनं संभाजी भिडे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावेत, असंही सचिन खरात यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”
विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये- संजय राऊत
“अजित पवार आता तुम्हाला कोणी वाचू शकत नाही, तुम्ही जेवढी मस्ती केली ती या आयुष्यातच भरावी लागणार”
“महाराष्ट्रात सत्ता नसल्यामुळे चंद्रकांत पाटलांचं मानसिक संतुलन ढासळलंय”