मुंबई : भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली होती. या टीकेला आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलंय.
‘भारतीय जनता पक्षातील अन्य कुठलीही व्यक्ती अशा पद्धतीने खालच्या पातळीवर प्रतिक्रिया देत नाही. पडळकर ही एक प्रवृत्ती आहे. भाजपमधील दोन-चार जणांचं मानसिक संतुलन ढासळलं आहे त्यामधील पडळकर हे एक आहेत. त्यांची ही बेताल वक्तव्य येत आहेत त्यावर गांभीर्याने लक्ष देणं योग्य वाटत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘ज्या व्यक्तीने बिरोबाची शप्पथ खाऊन स्वतःच्या समाजाला फसवलं आहे. त्यांच्यावर देवस्थान भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. एका म्हाताऱ्या महिलेची जमीन बळकावणे आणि मंगळसूत्र चोरीचाही गुन्हा त्यांच्यावर आहे. ती व्यक्ती एक प्रवृत्तीच आहे. अशी बांडगुळं भाजपमध्ये वाढत आहेत. याचं आत्मचिंतन भाजपने करावं’, असही अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
अजित पवार आणि अनिल परब यांची CBI चाैकशी करा; भाजपचं अमित शहांना पत्र
“अहमदनगरमध्ये सांगली-जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती; महापालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता”
“चंद्रकांत पाटील यांचं चित्रा वाघ यांना पत्र; सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी”
“तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो, त्यामुळे मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”