Home महाराष्ट्र “तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो, त्यामुळे मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”

“तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो, त्यामुळे मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका”

मुंबई : ओबीसी आरक्षणावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला होता. यावर बाळासाहेब थोरात यांची मुलगी आणि अमृतवाहिनी कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या संचालिका शरयू देशमुख यांनी प्रतिक्रिया देत पडळकरांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं होतं.

पात्रता पेक्षा जास्त मिळाले कि अस होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार..!, असं ट्विट करत शरयू देशमुख यांनी गोपीचंद पडळकरांना टोला लगावला होता. यावर पडळकरांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काही घराणे अतिसुसंस्कृत आहेत. मी शिक्षकाचा मुलगा आहे. त्यामुळे मला सुसंस्कृतपणा माहिती आहे. तुमच्या विरोधात बोललं की असंस्कृतपणा दिसतो. मला सुसंस्कृतपणा तुम्ही शिकवू नका, असं म्हणत पडळकरांनी शरयू देशमुखांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, महसूलमंत्री पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षांअगोदरच झालं आहे. याचेही भान यांना राहिले नाही, असं पडळकरांनी म्हटलं होतं. यावर शरयू देशमुख यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

“प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी यांच्या पतीचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन”

“दहावी, बारावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता; असा पाहू शकता निकाल”

“फडणवीसांनी संन्यास घेतला तर मराठी माणसाचा जाच संपेल”

शिवसेनेचा मोठा निर्णय, सर्व आमदारांना ‘व्हिप’ जारी