Home महाराष्ट्र पंतप्रधान मोदी आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत”

पंतप्रधान मोदी आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ‘नरेंद्रभाई’ आहेत”

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. तेंव्हापासून अनेक चर्चांना उधाण आलं होतं. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंतप्रधान मोदी- उद्धव ठाकरे यांच्यात दिल्लीत चर्चा झाली असली तरी वेगळा अर्थ काढायची गरज नाही. या दोन्ही बैठकांमागे काहीही राजकारण नाही. आजही मोदी हे ठाकरेंसाठी नरेंद्रभाई आहे, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष पूर्ण करेल, पण केंव्हातरी पूर्णविराम द्यावा लागेल. सरकारला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. सरकारमध्ये तीन पक्ष असल्यामुळे मतभिन्नता असेल पण आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नसल्याचं संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“संजय राऊतांनी 6 आठवड्यांचं अधिवेशन बोलवावं, आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं”

“आरक्षणही नाही आणि विद्यार्थ्यांना सवलतीही नाहीत, मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक”

भाजपामध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?; अनिल देशमुख प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल

“…मग ती मेट्रोच्या कार्यक्रमात जमवलेली हजारोंची गर्दी दुसरी लाट थोपवण्यासाठी होती का?”