जोपर्यंत मागास आयोगाचा अहवाल येत नाही, तोवर इतर सवलती तरी समाजाला देण्यात यावा अशी मागणी करत मराठा आरक्षणावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
आरक्षणही नाही आणि विद्यार्थ्यांना सवलतीदेखील नाहीत. मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक आहे ? जोपर्यंत मागास आयोगाचा अहवाल येत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांना सवलती मिळाल्या पाहिजेत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
सारथी सुरु झाली. पण सारथी तारादूत आहे. मराठा समाजाला मिळणाऱ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचवणारं एक माध्यम, 400 जण होते, ते कुठे आहेत? UPSC करायला दिल्लीला जाण्यासाठी शिष्यवृत्ती होती, ती कुठे आहे? विदेशात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठीची फेलोशिप कुठे आहे? पण सरकार सकारात्मक आहे. हॉस्टेल सुरु केले? अर्धी फी आकारणार, केलं का?, असे सवाल चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केले.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपामध्ये सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का?; अनिल देशमुख प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल
“…मग ती मेट्रोच्या कार्यक्रमात जमवलेली हजारोंची गर्दी दुसरी लाट थोपवण्यासाठी होती का?”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत मुंबईतील एच.एन रिलायन्स रूग्णालयात दाखल”
“आता वाटायला लागलंय, मुख्यमंत्र्यांनाच तिसरी लाट हवी आहे”