मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानांवर ईडीनं छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स देखील बजावले आहेत. या चौकशीसाठी अद्याप अनिल देशमुख उपस्थित राहिले नसले, तरी त्यावरून आता विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केली आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय.
अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घ्यायला हवी. भाजपाच्या लोकांवर कधी असे आरोप झाले नाहीत का? सगळे धुतल्या तांदळासारखे आहेत का? ते सगळे हरिश्चंद्राचे अवतार आहेत का? बाकी सगळे हरामखोर आहेत का?” असे सवाल करत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. संजय राऊतांनी आज पत्रकारांशी बोलताना भाजपावर निशाणा साधला.
दरमयान, अनिल देशमुख यांच्याविषयी मुख्यमंत्र्यांशी बोललो. अनिल देशमुख यांची एक बाजू आहे. ती समजून घेतली पाहिजे. त्यातले बरेच विषय मी सुद्ध समजून घेतले आहेत. प्रताप सरनाईक यांचीही बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर आरोप लावून ईडी किंवा केंद्रीय तपास यंत्रणा त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“…मग ती मेट्रोच्या कार्यक्रमात जमवलेली हजारोंची गर्दी दुसरी लाट थोपवण्यासाठी होती का?”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: ड्रायव्हिंग करत मुंबईतील एच.एन रिलायन्स रूग्णालयात दाखल”
“आता वाटायला लागलंय, मुख्यमंत्र्यांनाच तिसरी लाट हवी आहे”
तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरी लाटच पुन्हा उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे