Home महाराष्ट्र “आता वाटायला लागलंय, मुख्यमंत्र्यांनाच तिसरी लाट हवी आहे”

“आता वाटायला लागलंय, मुख्यमंत्र्यांनाच तिसरी लाट हवी आहे”

मुंबई : आरोग्य यंत्रणा आणि ऑक्सिजन बेडसचा तुटवडा असतानाही महाराष्ट्राने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा यशस्वी सामना केला. पण आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. परंतु, कोरोनाची दुसरी लाट पूर्णणे ओसरलेली नाही. तिसरी लाट कधी येईल सांगता येत नाही, असा गंभीर इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आता वाटायला लागलय मुख्यमंत्र्यानाच तिसरी लाट हवी आहे. मंत्रिमंडळातले मंत्री कार्यालयाच्या उद्घाटनाला गर्दी करतात, स्वतः मुख्यमंत्री मेट्रोला झेंडा दाखवताना तुडुंब गर्दी झाली. मुख्यमंत्री फक्त सामान्य जनतेला धडे देतात पण जिथे मंत्र्यांची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्र्याची चालत नाही., असं ट्विट करत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरी लाटच पुन्हा उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“होय, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे”

“संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा, शिवसेनेची चिंता करावी”

नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून नारायण राणेंचा शिवसेनेला टोला