Home महाराष्ट्र तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरी लाटच पुन्हा उलटेल- मुख्यमंत्री...

तिसऱ्या लाटेचं सोडा, पण गर्दी कराल तर दुसरी लाटच पुन्हा उलटेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : लाॅकडाऊन शिथील करण्यात आल्यानंतर आता पुन्हा गर्दी होत आहे. अशीच गर्दी होत राहिली तर दुसरीच लाट पुन्हा उलटेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

आरोग्य यंत्रणा आणि ऑक्सिजन बेडसचा तुटवडा असतानाही महाराष्ट्राने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा यशस्वी सामना केला. पण आता कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. परंतु, कोरोनाची दुसरी लाट पूर्णणे ओसरलेली नाही. तिसरी लाट कधी येईल सांगता येत नाही, असा गंभीर इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. ते मालाडमधील कोविड रुग्णालयाच्या ऑनलाईन लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

दरम्यान, कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसून सध्या जरी बेडस रिकामे दिसत असले तरी दुसरी लाट परत उलटू नये म्हणून आपल्याला गर्दी टाळणे, मास्क घालणे हे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“होय, मी भक्त आहे आणि त्याचा मला अभिमान आहे”

“संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची चिंता करण्यापेक्षा, शिवसेनेची चिंता करावी”

नक्कीच हा वाघ सर्कशीतीलच असला पाहिजे; वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून नारायण राणेंचा शिवसेनेला टोला

“देवेंद्र फडणवीस यांची नौटंकी महाराष्ट्राला समजलीये, त्यामुळे जनताच आता फडणवीसांना संन्यास देईल”