नांदेड : ओबीसी आरक्षणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला होता. जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठसुट तर केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हांला सांगा, आम्ही देऊ ओबीसी आरक्षण चार महिन्यात., असं फडणवीसांनी म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
फडणवीस म्हणतात, सत्तेत आल्यावर मी आरक्षणाचा प्रश्न सोडवणार. म्हणजेच सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही. सत्ता नसेल तर महाराष्ट्रासाठी काहीच देणार नाही, हा तर फडणवीसांचा दुटप्पीपणा आहे. परंतु त्यांनी सत्तेत येण्याची गरज नाही. आम्ही सरकार चालवण्यास सक्षम आहोत. त्यांनी फक्त आम्हाला मार्ग सांगावा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, भाजपला आणि फडणवीसांना ऐवढाच जर कळवळा असता तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना एवढे वर्ष तुरुंगात ठेवलं नसतं. त्यांचे त्या काळात अतोनात हाल केले. तसेच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्याला त्रास देवून पक्ष सोडण्यास मजबूर केलं. त्यामुळे आता ओबीसीसाठी आंदोलन करणं हे हास्यापद आहे, अशी टीका जयंत पाटलांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
…आज तेच भाजपचे लोक ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आंदोलन करत आहेत- जितेंद्र आव्हाड
“ओबीसींच्या आरक्षणासाठी मंत्रीपदाला लाथ मारण्याचा दम आहे का?”
…त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करू नये- संजय राऊत
पुण्यामध्ये सोमवारपासून नवे निर्बंध जाहीर- महापाैर मुरलीधर मोहोळ