बीड : ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजपतर्फे काल विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत काल परळीमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना त्यांनी, महाविकास आघाडी व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
ओबीसींच्या आरक्षण प्रश्नासाठी मंत्रिपदाला लाथ मारण्याचा दम महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील एकातरी मंत्र्यात आहे का?, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला लगावला. तसेच केंद्राकडून सगळं मागायचं असेल तर राज्य चालवायला केंद्राकडून माणूस मागून घ्या, भाजपमध्ये मध्ये खूप खमके माणसं आहेत. राज्य चांगल्या पद्धतीने चालवू शकतात, असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी सरकारला सुनावलं.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आणि ओबीसीचे आरक्षण रद्द झालं. राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. केंद्राने हे केले नाही, ते केले नाही. मग राज्य चालवायला माणूस मागून घ्या, असे खडेबोल प्रीतम मुंडेंनी यावेली सरकारला सुनावले.
महत्वाच्या घडामोडी –
…त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणाच्या विषयावर राजकारण करू नये- संजय राऊत
पुण्यामध्ये सोमवारपासून नवे निर्बंध जाहीर- महापाैर मुरलीधर मोहोळ
छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता- चंद्रशेखर बावनकुळे
सौ चुहे खाके बिल्ली हज को चली; चक्का जाम आंदोलनावरून जयंत पाटलांचा भाजपला टोला