Home पुणे पुण्यामध्ये सोमवारपासून नवे निर्बंध जाहीर- महापाैर मुरलीधर मोहोळ

पुण्यामध्ये सोमवारपासून नवे निर्बंध जाहीर- महापाैर मुरलीधर मोहोळ

पुणे : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लाॅकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर राज्यात कोरोना रूग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारपासून नवी नियमावली लागू होत असल्याची माहिती दिली आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेत येणारी दुकाने आठवड्याचे सातही दिवस सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत तसेच अत्यावश्यक दुकानांव्यतिरिक्त इतर दुकाने ही सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तसेच शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ही सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील. त्या व्यतिरिक्त लोकलमधून फक्त सरकारी कर्मचारी व वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच प्रवास करता येणार आहे. तसेच सामाजिक धार्मिक कार्यक्रम हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहणार आहे.

कृषी व्यवसायाशी संबंधित सर्व सेवा या आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 4 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. जिम, सलून व ब्युटी पार्लर हे 50% क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सोमवार ते शुक्रवार सुरू राहणार आहेत. पुणे महापालिका क्षेत्रांमधील मॉल्स, थिएटर्स ही पूर्णपणे बंद राहणार आहेत.

हॉटेल, रेस्टॉरंट, फूड कोर्ट हे सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. तसेच दुपारी 4 नंतर तसेच शनिवार आणि रविवार फक्त पार्सल आणि घरपोच सेवा देण्यास रात्री 11 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

छगन भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये, तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता- चंद्रशेखर बावनकुळे

सौ चुहे खाके बिल्ली हज को चली; चक्का जाम आंदोलनावरून जयंत पाटलांचा भाजपला टोला

“…तर कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये कोणत्याही दिवशी चर्चेला तयार”

“राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू; पहा काय सुरू, काय बंद”