मुंबई : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लाॅकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर राज्यात कोरोना रूग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार ते खालीलप्रमाणे :
हे सुरू राहणार
अत्यावश्यक दुकाने सकाळी 7 ते 2
हॉटेल 50 टक्के क्षमतेनं सोमवार ते शुक्रवार दु.2 पर्यंत चालू राहतील
मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत मुभा
लग्नसोहळे 50 टक्के क्षमतेनं तर अंत्यविधीला 20 लोकांची उपस्थिती
हे बंदच राहणार
सर्व मॉल आणि थिएटर बंद राहणार
हॉटेल शनिवार, रविवार बंद
लोकल आणि रेल्वे बंदच राहतील
जमावबंदी आणि संचारबंदी कायम असेल
महत्वाच्या घडामोडी –
“देवेंद्र फडणवीस माझे गाॅडफादर, राजीनामा दिला तरी भाजपमध्येच राहणार”
“राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे मराठा आरक्षण टिकलं नाही”
राज्यातील सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करुन देणारा- केशव उपाध्ये
“देशमुखांवरील कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार; संजय राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवतायेत”