मुंबई : शरद पवारांवर पीएचडी करण्यासाठी मी विद्यार्थी म्हणून 10-12 वर्ष अभ्यास करण्यास तयार आहे, असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्यृत्तर दिलं आहे.
पावारांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा मला अभ्यास करायचा आहे. शरद पवार यांना मागील 50 वर्षात महाराष्ट्रात कधीही 5 ते 7 हून अधिक खासदारही निवडून न आणता देशाच्या राजकारणाच्या मध्यवर्ती कसं राहता आलं? हा माझ्या पीएचडीचा विषय आहे. त्यासाठी वेळ देण्याची विद्यार्थी म्हणून माझी तयारी आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
एखादा विषय जेव्हा आपण मिशन म्हणून करतो. त्याला अभ्यास आणि संशोधनासाठी निवडतो तेव्हा त्यासाठी जो वेळ लागेल तो लागेल. त्यांना 12-13 वर्ष वाटत असेल पण कदाचित जास्तही लागेल. माझी त्याची तयारी आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, चंद्रकांत पाटलांना माझ्यावर पीएचडी करण्यासाठी 10 ते 12 वर्ष लागतील, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं होतं.
महत्वाच्या घडामोडी-
सरकारमधील पक्षांमध्ये आपापसांतच सुसंवाद नाही- देवेंद्र फडणवीस
वारिस पठाण औरंगजेबाचे वारिस; त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील-सुधीर मुनगंटीवार
दोन भाऊ वेगळे झाले तरीही नातं तुटत नाही- चंद्रकांत पाटील
“…तर मी देवेंद्र फडणवीस यांना ‘भाऊ’ म्हणून हाक मारेन”