नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुखयांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता.
अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर (Enforcement Case Information Report) दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता.
दरम्यान, ईडीने आज सकाळी पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली.
महत्वाच्या घडामोडी –
” ही महाविकास आघाडी नव्हे, ही तर ‘महाविनाश’ आघाडी”
तुमच्यात हिंमत नसेल तर आम्हांला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो- देवेंद्र फडणवीस
“भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला?