Home महाराष्ट्र तुमच्यात हिंमत नसेल तर आम्हांला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो- देवेंद्र फडणवीस

तुमच्यात हिंमत नसेल तर आम्हांला सांगा, चार महिन्यात आरक्षण देतो- देवेंद्र फडणवीस

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला.

जाणीवपूर्वक ओबीसींना राजकीय आरक्षणच द्यायचं नाहीये. उठसुट तर केंद्राकडे बोट दाखवतात. अरे नसेल तुमच्यात हिंमत तर आम्हाला सांगा, आम्ही जर चार महिन्यात. हो आमचं राज्य असतं, तर आम्ही चार महिन्यात ओबीसींचा एम्पिरिकल डेटा तयार करुन जर ओबीसींचं आरक्षण पूर्ववत आणलं नाही तर पदावर देखील राहणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. आज भाजप पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यात ते बोलत होते.

दरम्यान, ज्यावेळी हायकोर्टात आरक्षणाचा विषय मांडायला हवा होता. त्यावेळी हायकोर्टात तारखा घेत होते आणि मंत्री रस्त्यावर मोर्चा काढत होते. एवढंच नाही, तर आजही पहा इम्पेरिकल डेटा तयार करत नाहीयेत, तर त्याऐवजी यांचेच कार्यक्रम, मोर्चे सुरू असल्याचं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला?

काँग्रेसचा स्वबळाचा आग्रह शेवट पर्यंत टिकेल असं वाटत नाही- जयंत पाटील

मंत्री झाले राजे आणि प्रत्येक विभागात एक-एक वाझे- देवेंद्र फडणवीस

“जितेंद्र आव्हाडांची नाराजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली दूर; काढला ‘हा’ तोडगा”