मुंबई : “महाराष्ट्र सरकार हे कायद्याने चालत नाही, इथे संवैधानिक नियमांची पायमल्ली होत आहे, हे राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून द्या, अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन तीन मागण्या केल्या. यामध्ये राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे, त्यामुळे अधिवेशनाचा काळ दोन दिवसाऐवजी पूर्ण अधिवेशन घ्यावं, विधानसभा अध्यक्षांची रखडलेली निवडणूक घ्यावी आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देऊ नका, अशा मागण्या भाजपने राज्यपालांकडे केल्या आहेत.
दरम्यान, आज आम्ही राज्यपालांची भेट घेतली. राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. सरकारी पक्षाचे कार्यक्रम होतात, पण कोरोनाचे कारण सांगून अधिवेशन मात्र दोन दिवसांचं घेतलं जातं. अधिवेशन दोन दिवसांचं आणि जिल्हा परिषद निवडणुका मात्र होतात, त्याला कोणता डेल्टा नाही ना कोणता व्हायरस. ज्या पद्धतीचे घोटाळे बाहेर येत आहेत, महाराष्ट्रातील परिस्थिती आहे, विद्यार्थी, महिला, आरक्षण याचा आक्रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे अधिवेशनापासून पळ काढला जात आहे, हे अधिवेशन घेण्याची मागणी आम्ही केली. जास्तीत जास्त अधिवेशन घ्यायला लावावं, अशी मागणी राज्यपालांकडे केली, असं फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील असं शरद पवार म्हणालेत”
26 जूनच्या आंदोलनात महाविकास आघाडी सरकार जळून जाईल- सुधीर मुनगंटीवार
2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही- नाना पटोले
“राजस्थान राॅयल्सला मोठा धक्का! राजस्थानच्या ‘या’ स्टार खेळाडूची IPL च्या उर्वरित सामन्यांतून माघार”