मुंबई : सध्या राज्यात विविध मुद्य्यांवरून महाविकासआघाडी मधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत मतभेद निर्माण होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली.
शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असं पवार म्हणाले, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
दरम्यान, शरद पवारांसोबत झालेल्या चर्चेबद्दल संजय राऊतांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
मा.श्री.शरद पवार यांना भेटलो. दिल्ली महाराष्ट्रातील घडामोडींवर चर्चा
झाली. महाराष्ट्र सरकारच्या स्थिरते संदर्भात त्यांच्या मनात शंका दिसत नाही.
उद्धव ठाकरे पाच वर्षाचा कालावधी पुर्ण करतील. ते मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय आहेत असे श्री.पवार म्हणाले. @PawarSpeaks @OfficeofUT— Sanjay Raut (@rautsanjay61) June 23, 2021
महत्वाच्या घडामोडी –
26 जूनच्या आंदोलनात महाविकास आघाडी सरकार जळून जाईल- सुधीर मुनगंटीवार
2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही- नाना पटोले
“राजस्थान राॅयल्सला मोठा धक्का! राजस्थानच्या ‘या’ स्टार खेळाडूची IPL च्या उर्वरित सामन्यांतून माघार”
“अहमदनगरमध्ये महापाैरपदाच्या निवडणूकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र”