मुंबई : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 5 आणि 6 जुलै रोजी होणार आहे. मात्र विरोधी पक्ष भाजपाने अधिवेशन किमान 15 दिवसांचं तरी घेण्यात यावं अशी मागणी केली होती. यामुळे आता सध्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. यावरुन विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर टीका केली आहे.
सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. करोनाच्या संकटाला सामोरं जाणण्यासाठी आमचं संपूर्ण सहकार्य आहे. परंतु, आज सरकार महत्वाचे विषय मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण असेल, दलित समाजाच्या पदोन्नतीचा विषय असेल, हे जे अत्यंत महत्वाचे विषय आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, शाळा बंद आहेत, आपण मुलांना पास केलं असलं, तर लाखो मुलं आज फी न भरल्यामुळे नापास झाल्यात जमा आहेत, शिक्षणाचा विषय आहे. कारखाने बंद आहेत, बेरोजगारी वाढली आहे त्यामुळे कर्जाचे हप्ते देऊ शकत नाहीत, असे अनेक प्रश्न आहेत. आशा कार्यकर्त्या, परिचारिका यांचे देखील विषय आहेत. 25 जूनपर्यंत कार्यक्रम दाखवला होता. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर दाखवलेला कार्यक्रम तरी घेणं अपेक्षित होतं. त्यामुळे आम्ही दोन आठवड्याचं तरी अधिवेशन घ्या, अशी मागणी विधानसभा व विधानपरिषदेत दोन्ही ठिकाणी आम्ही केली, असंही प्रवीण दरेकरांनी सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा परदेशात काळा पैसा, ईडीला पुरावे देणार; आमदार रवी राणांचा आरोप
मोदी आहेत नंबर वन, त्यामुळे….; रामदास आठवलेंचा त्यांच्या खास शैलीत विरोधकांना टोला
सरकार कोरोनाला घाबरत नाही तर विरोधी पक्षाला घाबरतंय- चंद्रकांत पाटील
सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे- देवेंद्र फडणवीस