मुंबई : महाविकास आघाडी सरकारने यंदाचं पावसाळी अधिवेशन 2 दिवसांचं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
2 दिवसाच्या अधिवेशनानं काय होणार. किमान महिनाभरासाठी तरी अधिवेशन घेतलं पाहिजे. तरच जनतेच्या समस्यांवर चर्चा होईल. कोरोनाचं निमीत्त पुढे करून अधिवेशन केवळ दोनच दिवसांचं घेतलं जात आहे. ही सरकारची पळवाट आहे. हे सरकार कोरोनाला घाबरत नाही तर विरोधी पक्षाला घाबरत आहे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावाला.
दरम्यान, चंद्रकांत पाटील हे पालघर दाैऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर टीका केली.
महत्वाच्या घडामोडी –
सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे- देवेंद्र फडणवीस
“महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आले आहेत”
“मर्दासारखं लढत रहायचं की, गुडघे टेकून शरण जायचं याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा”
“बंगल्यावर सुट्टीची मजा लुटणारे अविनाश भोसले म्हणजे काय मल्ल्या आहे?; असं विचारणार की नाही?”