मुंबई : दोन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होत, त्यामध्ये त्यांनी भाजपसोबत पुन्हा युती करण्याची मागणी केली होती. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते मुंबईत प्रसारमध्यामांशी बोलत होते.
देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकारं जास्तकाळ टिकत नाहीत. हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, तीन पक्षात विसंवाद आहे, त्यांच्यात एकमेकांवर विश्वास राहिला नाही, हे सर्वांना माहीत आहे. पण तुमच्या भानगडीत जनतेला का भरडता? असा सवाल करतानाच सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचं नुकसान होत आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष केवळ सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आले आहेत”
“मर्दासारखं लढत रहायचं की, गुडघे टेकून शरण जायचं याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा”
“बंगल्यावर सुट्टीची मजा लुटणारे अविनाश भोसले म्हणजे काय मल्ल्या आहे?; असं विचारणार की नाही?”
…त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाणार नाही- बाळासाहेब थोरात