Home महाराष्ट्र “मर्दासारखं लढत रहायचं की, गुडघे टेकून शरण जायचं याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी...

“मर्दासारखं लढत रहायचं की, गुडघे टेकून शरण जायचं याचा विचार शिवरायांच्या मावळ्यांनी करावा”

मुंबई : सत्तेत एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्रा.नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलं. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सरनाईक यांना भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा वापर करुन त्रास देतंय, असा आरोप केला होता. यावर आता सामना अग्रलेखातून प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे सरकार आहे व तीनही पक्षांना हे विनाकारण त्रास देण्याचे उपद्वयाप सुरू झाले आहेत. आता या अन्यायाविरुद्ध मर्दासारखे लढत राहायचे की, हाती शस्त्र असूनही गुडघे टेकून शरण जायचे. याचा विचार शिवरायांचे मावळे समजणाऱ्या प्रत्येकाने करायलाच हवा, असा सल्ला सामनाच्या माध्यमातून दिला आहे.

दरम्यान, बरे-वाईट दिवस येतच असतात. वाईट दिवसही निघून जातात. सत्तेचा गैरवापर आणि बलप्रयोग हे कायमस्वरूपी नसते, असंही सामनात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“बंगल्यावर सुट्टीची मजा लुटणारे अविनाश भोसले म्हणजे काय मल्ल्या आहे?; असं विचारणार की नाही?”

…त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाणार नाही- बाळासाहेब थोरात

“मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत”

“बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला बघवत नाही”