मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या रडारवर असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40 कोटी 34 लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली.
अविनाश भोसलेची मालमत्ता जप्त झालीय. कुणाकुणासाठी बरं हा दु:खदायक दिवस असेल…’भोसले एव्हिएशन’च्या विमानांनी उडणारे, बंगल्यावर सुट्टीची मजा लुटणारे आता ‘भोसले म्हणजे काय मल्ल्या आहे?’ असं विचारणार की नाही?, असं ट्विट करत भातखळकरांनी अविनाश भोसलेंवर हल्लाबोल केला आहे.
अविनाश भोसलेची मालमत्ता जप्त झालीय. कुणाकुणासाठी बरं हा दु:खदायक दिवस असेल…’भोसले एव्हिएशन’च्या विमानांनी उडणारे, बंगल्यावर सुट्टीची मजा लुटणारे आता ‘भोसले म्हणजे काय मल्ल्या आहे?’ असं विचारणार की नाही? pic.twitter.com/fWiRSbv78i
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 21, 2021
महत्वाच्या घडामोडी –
…त्यामुळे शिवसेना भाजपसोबत जाणार नाही- बाळासाहेब थोरात
“मुख्यमंत्र्यांच्या घरबशा कारभारामुळे महाराष्ट्रातली स्मशाने अखंड धगधगतायत”
“बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला बघवत नाही”
“हिंगणघाटमध्ये भाजपला मोठा धक्का; आजी-माजी 12 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”