Home महाराष्ट्र “बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला बघवत नाही”

“बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला बघवत नाही”

मुंबई : सत्तेत एकत्र येऊन काँग्रेस-राष्ट्रवादी आपलेच कार्यकर्ते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा आपण पंतप्रधान आदरणीय श्रा.नरेंद्र मोदीजी यांच्याशी जुळवून घेतलेलं बरं, असं माझं वैयक्तिक मत आहे, असं पत्र शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

भाजप केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. स्व. बाळासाहेब ठाकरेंचा हात धरून भाजप पक्ष महाराष्ट्रात वाढला, त्याच शिवसेनेला आता भाजप त्रास देत आहे., असं नाना पटोलेंनी म्हटलं.

दरम्यान, भाजपचं हे कृतघ्नपन असून बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे भाजपला पाहवत नाही. त्यामुळे ते खुर्ची ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“हिंगणघाटमध्ये भाजपला मोठा धक्का; आजी-माजी 12 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश”

“पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची तब्बल 40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त”

“सत्ता गेल्यानं ज्यांच्या पोटात दुखत आहे, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार 5 वर्ष चालणार”

“निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर पुन्हा शरद पवारांच्या भेटीला, आता दिल्लीत खलबतं; चर्चांना उधाण”