मुंबई : गेल्या सात महिन्यांपासून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक चर्चेत नव्हते. आज अचनाक प्रताप सरनाईक चर्चेत आले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्रं लिहिलं आहे. या पत्रात सरनाईक यांनी भाजपबरोबर युती करण्यापासून ते ईडीपासून होणाऱ्या त्रासापासूनची माहिती दिली आहे.
आपण गेले दीड वर्षे राज्याची धुरा यशस्वी व समर्थपणे सांभाळत आहात. कोरोना सारख्या महासंकटाला आपण ज्या पद्धतीने तोंड दिले, या संकटाचा मुकाबला केला याबद्दल प्रत्येक जण आपल्या नेतृत्वाचे कौतुक करत आहे. महाराष्ट्राची जनताच नाही तर देशात विदेशातही ‘महाराष्ट्र मॉडेल’ व आपल्या कार्यशैलीचे खूप कौतुक होत आहे. याचा आपले कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान आहे, असं प्रताप सरनाईकांनी या पत्रात म्हटलं आहे.
एकीकडे आपण राजकारण बाजूला ठेऊन फक्त आणि फक्त आपल्या मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वाटत आहे. त्यात काँग्रेस पक्ष “एकला चलो रे” ची भूमिका घेत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या पक्षाचे नेते कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचे नेते कार्यकर्ते फोडत असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच महाविकास आघाडीतील काही मंत्री व काही सनदी अधिकारी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा आपल्या पाठीमागे लागू नये म्हणून केंद्रातील सत्ताधारी पक्षासह आपल्या नकळत छुपी हातमिळवणी करीत आहेत हेही आपल्या निदर्शनास आणून देत आहे, असं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.
दरम्यान, कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुध्दा सतत आघात होत आहेत, खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल, असंही प्रताप सरनाईकांनी या पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“बाळासाहेब ठाकरेंसाठी वाईट वाटतं, शिवसेनेची सुरूवात केली वाघांना घेऊन…संपणार कुत्र्यांमुळे”
“स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावं आणि मग निर्णय घ्यावा”
…याला म्हणतात शिवसैनिक; दादरमधील राड्यावरुन उद्धव ठाकरेंचा निशाणा
“एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला, तर लोकं जोड्याने हाणतील”