मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त बोलताना दादरमध्ये सेनाभवनासमोरील राड्यावरुन भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.
शिवसेना प्रमुखांचं जुनं भाषण व्हायरल होतंय. त्यातलं एक वाक्य ‘त्याचा फटकन आवाज आला, तर आपला काडकन आवाज आला पाहिजे’. हे भाषण दोन दिवसापासून सगळीकडे का व्हायरल होत आहे हे ज्याचं त्याला माहिती आहे. याला म्हणतात शिवसैनिक, असं म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, ही शिवसैनिकाची ओळख आहे. असं असलं तरी फक्त हाणामाऱ्या करणं, खुनखराबा करणं हे आपलं काम नाही. रक्तपात करणं हा शिवसैनिकाचा गुणधर्म नाही. अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही. पण ही ओळख जर कुणी मुद्दाम करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकांची ओळख अनेकांना आहे, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला, तर लोकं जोड्याने हाणतील”
ज्यांना काही उद्योग नाहीत ते…; निलेश राणेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर
कुणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापाैर सुद्धा शिवसेनेचाच होणार- किशोरी पेडणेकर
सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस झालाय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे