Home महाराष्ट्र “एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला, तर लोकं जोड्याने हाणतील”

“एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला, तर लोकं जोड्याने हाणतील”

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला होता. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसवर निशाणा साधला.

तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा अप्रत्यक्ष इशारा उद्धव ठाकरेंनी काँग्रसेला यावेळी दिला. शिवसेनेचा आज 55 वा वर्धापन दिन आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ काॅन्फरसिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ म्हणजे केवळ एकट्याने निवडणूक लढणं असं नाही. त्यासाठी ताकद लागते. स्वाभिमान लागतो, असं म्हणतंच कोरोनाचं संकट आहे. अशा वेळी स्वबळाचा नारा दिला, एक हाती सत्ता आणू म्हटलं तर लोकं तुम्हाला जोड्याने हाणतील, असा इशारा उद्धव ठाकरेंनी यावेळी दिला. तसेच स्वबळाचा नारा काय देता? माझ्या रोजी रोटीचं काय? तू पुढे चालला माझं काय? असं लोक म्हणतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

ज्यांना काही उद्योग नाहीत ते…; निलेश राणेंच्या टीकेला अजित पवारांचे प्रत्युत्तर

कुणी कितीही शड्डू ठोकले तरी पुढील महापाैर सुद्धा शिवसेनेचाच होणार- किशोरी पेडणेकर

सत्ता गेल्यानं भाजपचा जीव कासावीस झालाय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संजय राऊत काय शिंगावर घेणार?, त्यांना शिंग आहे कुठे?- नारायण राणे