Home महाराष्ट्र ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही- शरद पवार

ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही- शरद पवार

मुंबई : ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हाती नाही. सर्वकाही सुरळीत सुरु झाल्यावर मी दूर झालो. गरज भासली तरच सल्ला देतो, अन्यथा लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे, असं राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझ्याच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

मला ठाकरे सरकारबाबत कोणतीही शंका नाही. राज्याचं नेतृत्व अशा व्यक्तीकडे आहे जे सर्वांना सोबत घेऊन काम करेल, तसेच ते दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करणार नाही, असं शरद पवार म्हणाले.

महाविकास आघाडीमध्ये कसलीही कटुता नाही. हे सरकार पुढील पाच वर्ष चालेल यात मला कसलीही शंका वाटत नाही. सर्वकाही सुरळीत सुरु आहे. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला याचं समाधान आहे, असंही  शरद पवार म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“माझ्या बापाने रक्त गाळून हा पक्ष उभारला आहे; पक्षाची बदनामी कराला तर गाठ माझ्याशी आहे”

“वारिस पठाण यांचं वक्तव्य मुस्लिम समाजालाही मान्य नाही”

…तर पवारांची औलाद सांगणार नाही- अजित पवार

आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींना भारी आहोत; एमआयएमच्या नेत्याच वादग्रस्त वक्तव्य