नवी दिल्ली : भारताचे महान ॲथलिट मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. मिल्खा सिंग यांनी वयाच्या 91 व्या व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
काही दिवसापूर्वी मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल कौर यांचं निधन झालं होतं. मिल्खा सिंग यांचा 18 जून 2021 रोजी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी मृत्यू झाला.
दरम्यान, मिल्खा सिंग यांना 24 मे 2021 रोजी कोरोना उपचारासाठी मोहालीमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती जास्त खराब असल्यानं ते आयसीयूमध्ये उपचार घेत होते. 91 वर्षीय मिल्खा सिंग यांना 19 मे रोजी कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं. सुरुवातीला त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं जाणवली नव्हती. त्यामुळे त्यांना चंदीगडमधील आपल्या घरी गृहविलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. मात्र, नंतर त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम, परिणाम भोगावे लागतील- चंद्रकांत पाटील
“भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही, उद्याही घाबरणार नाही”
“…अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावं”
अजित पवारांच्या बैठकीदरम्यान तरुणाची मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, पोलिसांनी घेतलं ताब्यात