वर्धा : अयोध्येतील राम मंदिरासावरुन शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेना भवनावर मोर्चा काढला. त्यावेळी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद आणि बाचाबाची झाली. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला उत्तर देऊ म्हटलं होतं. यावरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उत्तर देण्याची वाट कसली बघताय. भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही आणि उद्याही घाबरणार नाही. मंत्र्यांना अश्या पद्धतीने बोलावं लागत आणि सामान्य कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहे, याच आत्मपरीक्षण शिवसेनेनं करावं, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आशिष शेलार आज वर्ध्यात आले होते. वर्ध्यात पदाधिकाऱ्यांशी बैठक घेतल्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“…अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावं”
अजित पवारांच्या बैठकीदरम्यान तरुणाची मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी, पोलिसांनी घेतलं ताब्यात
…तर राज्यात निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडेंचा सरकारला इशारा
मुंबईकरांवर कराचा बोजा लादलात, तर काँग्रेस पक्ष आडवा येईल- भाई जगताप