मुंबई : संभाजी छत्रपती यांनी आज उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर 25 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर दोन्ही राजेंनी मीडियाशी संवाद साधून मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर दोन्ही राजे एकत्र आले त्याचं स्वागतंच आहे. मात्र, दोन्ही राजे भाजपच्या कोट्यातून खासदार झाले आहेत. त्यामुळे केंद्राच्या भूमिकेबद्दल ते बोलत नाही. तर मिठाला जागल्यासारखं ते बोलत आहेत, असा उपरोधक टोला अरविंद सावंत यांनी यावेळी लगावला.
दरम्यान, अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
पाच वर्षे उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील- नाना पटोले
…तर काँग्रेसने महाविकासआघाडी सरकारचा पाठिंबा काढावा- रामदास आठवले
नारायण राणे दिल्ली दौऱ्यावर; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची चिन्हं
“दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही, उदयनराजे आणि माझं सर्वच मुद्द्यांवर एकमत”