गुलबर्गा : एमआयएमचे नेते वारिस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कर्नाटकमधील गुलबर्गा येथे CAA संदर्भातील मोर्चांचा संदर्भात वारिस पठाण यांच्या जाहीर भाषणाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं असून त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.
आम्ही 15 कोटी आहोत मात्र 100 कोटींना भारी आहोत हे लक्षात ठेवा. आम्ही मुद्दाम स्त्रियांना पुढं केलं, पण विचार करा अजून फक्त आमच्या सिंहिणी पुढे आल्या आहेत तरी यांचा घाम निघलाय. आम्ही सगळे एकत्र बाहेर पडलो तर काय होईल?, असं वारिस पठाण म्हणाले.
आता आपल्याला एकत्र आलं पाहिजे. एकत्रितपणे लढलं पाहिजे. स्वातंत्र्य तर मिळायलाच हवं. मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या. 15 करोड हैं मगर 100 के उपर भारी हैं, ये याद रखना! ‘इट का जवाब पत्थर से’ हे आता आम्ही शिकलो आहोत.
स्वातंत्र्य मिळालंच पाहिजे. ते मागून मिळालं नाही, तर हिसकावून घ्या, अशा शब्दात वारिस पठाण यांनी गरळ ओकली आहे, असंही वारिस पठाण यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…म्हणून नारायण राणेंचा जळफळाट होत आहे- विनायक राऊत
“अजितदादा इतके वर्ष आपण उगाच दूर होतो”
शरद पवारांनी दिला पक्षातील मंत्र्यांना ‘हा’ मोलाचा सल्ला
इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा, नाव बदलायचं की विकास करायचा; इम्तियाज जलील