पुणे : खेडमध्ये होणारं विमानतळ रद्द झाल्याने खेड तालुक्याचं मोठं नुकसान झालं आहे. खेड तालुक्यात प्रास्तावित रेल्वे आणि रिंगरोड हे दोन्ही प्रकल्प आहेत. ठिकठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. यासाठी रेल्वे बाधित शेतकऱ्यांच्या समस्या आणि भावना जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे राजगुरूनगर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
रेल्वे प्रकल्प आणि रिंग रोड अंमलात येणं गरजेचं आहे. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनींबाबत समाधानकारक तोडगा काढूनच हा प्रकल्प कार्यान्वित करण्यास प्राधान्य राहील. शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरवा करणार असुन शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असं अमोल कोल्हे यावेळी म्हणाले.
दरम्यान, पुणे-नाशिक रेल्वेमुळे हा खेड मतदार संघ हा थेट उत्तर आणि दक्षिण भारताशी जोडला जाणार असल्याने विकासाला मोठी चालना मिळणार आहे. त्यामुळे तो अंमलात येणं गरजेचं असल्याचंही अमोल कोल्हेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
2024 नंतरही ‘ते’ भावी पंतप्रधानच असतील; अतुल भातखळकरांचा टोला
“वाघाच्या मिशीला हात लावयला देखील हिंमत लागते, या मी वाट बघतोय”
“मराठा आरक्षण आंदोलन संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली यशस्वी होईल”
मला कुणी शिकवण्याची गरज नाही; संभाजी छत्रपतींनी चंद्रकांतदादांना सुनावलं