कोल्हापूर : मराठा आरक्षण प्रश्नावर संभाजी राजे छत्रपती यांनी आंदोलनाची भूमिका विशद केली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नासाठी आंदोलन करण्याची गरज व्यक्त करतानाच संभाजीराजे हे राज्यातील आघाडी सरकारला मदत करीत आहेत का, अशी विचारणा केली होती. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मत व्यक्त केलंय.
करोना संसर्गाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने खासदार संभाजीराजे छत्रपती हे मराठा आरक्षणाची भूमिका टप्प्याटप्प्याने मांडत आहेत. पण सत्ता गेल्यापासून अस्वस्थ झालेले आमदार चंद्रकांत पाटील हे त्यांना मोर्चे काढण्यास प्रवृत्त करत आहेत. संयत भूमिका मांडणाऱ्या संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन यशस्वी होईल, असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
मराठा आरक्षण प्रश्नी संभाजीराजे संयमाने पुढे जाण्याच्या भूमिकेत आहेत. चंद्रकांत पाटील हे त्यांना आंदोलन केले पाहिजे, असे म्हणून उचकवत आहेत. सध्या करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. याची संभाजीराजे यांना जाणीव असून आताच्या काळात त्यांची भूमिका रास्त आहे, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
मला कुणी शिकवण्याची गरज नाही; संभाजी छत्रपतींनी चंद्रकांतदादांना सुनावलं
काँग्रेस नेते राहुल गांधी हेच पंतप्रधान होणार आहेत- नाना पटोले
…त्यामुळे एक दिवस अजित पवारच हे सरकार पाडतील- रामदास आठवले
“पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ ‘भाजपशी’ हे सरकारनं लक्षात ठेवावं”