नगर : आम्ही संभाजीराजेंना भाजपचे मानतो, ते स्वत:ला भाजपचे मानतात की नाही माहीत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्या टीकेला खासदार संभाजी छत्रपती यांनी उत्तर दिलं आहे.
मला कुणी शिकवण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी जर मला सल्ला दिला तर बोलेल. आता बोलणार नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी चंद्रकांतदादांवर पलटवार केला आहे. खासदार संभाजी छत्रपती आज कोपर्डीत आले होते. यावेळी त्यांनी पीडिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी ते बोलत होते.
मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. 2007 पासून मी मराठा आंदोलनात आहे. हे केव्हा आले हेच मला कळत नाही. जरा त्यांना विचारा, असं सांगतानाच मला कुणी शिकवण्याची गरज नाही. मला देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतीर तर मी त्यावर बोलेन, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेस नेते राहुल गांधी हेच पंतप्रधान होणार आहेत- नाना पटोले
…त्यामुळे एक दिवस अजित पवारच हे सरकार पाडतील- रामदास आठवले
“पायी वारीत वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागला तर गाठ ‘भाजपशी’ हे सरकारनं लक्षात ठेवावं”
संजय राऊतांच्या मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरू; नाना पटोलेंचा टोला