Home महाराष्ट्र “वाघ हा वाघच असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर फक्त...

“वाघ हा वाघच असतो मग तो पिंजऱ्यातला असो की जंगलातला, महाराष्ट्रावर फक्त वाघाचं राज्य”

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं आहे.

वाघाशी मैत्री होत नाही, वाघ ठरवतो कुणाशी मैत्री करायची, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. यावर चंद्रकांत पाटलांनी, आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झाला आहे, असा टोला संजय राऊतांना लगावला होता. यावर आता संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हते तेव्हापासून भाजपची वाघाशी मैत्री होती. मैत्री कोणाशी करायचे हे वाघ ठरवतो. वाघ हा वाघ असतो. मग तो पिंजऱ्यातला असो किंवा जंगलातला. महाराष्ट्रावर वाघाचे राज्य आहे, असं जोरदार प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी”

बसमधूनच 10 मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी, विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रवेश नाही- अजित पवार

“प्रसिद्ध अभिनेते बोमण ईराणी यांच्या आईचे दु:खद निधन”

“स्वतःला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती”