Home पुणे बसमधूनच 10 मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी, विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रवेश नाही- अजित...

बसमधूनच 10 मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी, विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रवेश नाही- अजित पवार

पुणे : यंदाही आषाढी वारी एसटी बसनेच जाऊ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावर्षी प्रमुख पालखी सोहळ्यात जास्त लोकांना जाण्याची परवानगी देण्यात आली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

आषाढी वारी संदर्भात नेमण्यात आलेल्या समितीची अहवाल प्राप्त झाल्यानंतर कॅबिनेट बैठकीत चर्चा करून वारी संदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची माहिती अजित पवारांनी दिली.

अनेक जणांची पायी वारीसाठी मागणी होती. मात्र ते करू नये, अशी अनेक ग्रामस्थांनी मागणी केली. पायी वारी असेल तर दर्शनाची गर्दी टाळता येणार नाही, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.

दरम्यान, आषाढी एकादशी 20 जुलैला आहे.  1 जुलै रोजी संत तुकाराम महाराज, 2 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे देहू व आळंदीतून प्रस्थान होईल. यंदा 10 पालख्यांना 20 बसेस देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. प्रस्थान वारीत 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक वारीत 40 लोकांना परवानगी देण्यात आली असल्याचं अजित पवारांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“प्रसिद्ध अभिनेते बोमण ईराणी यांच्या आईचे दु:खद निधन”

“स्वतःला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती”

निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती”