मुंबई : मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
पावसाच्या येता सरी…मुंबई पाण्याने भरी…मुख्यमंत्री बसले घरी…मुंबईची जनता विचारी…‘ही’ कुणाची जबाबदारी ???, असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
पावसाच्या येता सरी…
मुंबई पाण्याने भरी…
मुख्यमंत्री बसले घरी…
मुंबईची जनता विचारी…
‘ही’ कुणाची जबाबदारी ???#MumbaiRains
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 9, 2021
महत्वाच्या घडामोडी –
लसीकरणाचा 6 हजार कोटींचा चेक कुठे गेला?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
“राहुल गांधींनी आता स्वतः भाजपात प्रवेश करावा हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय”
कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच; कधीही येतो, कधाही जातो- राखी सावंत
वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती, उद्धवजींची मैत्री मोदीजींशी- चंद्रकांत पाटील