पुणे : देशातील लसीकरण मोहीम आता पूर्णपणे केंद्र सरकारनं हाती घेतल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे. 21 जूनपासून देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत लस दिली जाणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. याच मुद्द्यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधालय.
लसीकरणाचा 6 हजार कोटी रुपयांच्या चेक खिशात घेऊन फिरत होता. त्या चेकचं काय झालं? चक्रीवादळात ज्यांचं नुकसान झालं त्यांना देणार आहात का? मराठा समाजाला देणार आहात का? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जात आहे. यासंदर्भात केंद्र सरकारकडे काहीच नाही. मराठा समाज मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. पण राज्य सरकारकडून फक्त धुळफेक सुरु आहे, असं म्हणत आरक्षणावरुनही पाटील यांनी ठाकरे सरकारवर टीका केलीय.
महत्वाच्या घडामोडी –
“राहुल गांधींनी आता स्वतः भाजपात प्रवेश करावा हाच त्यांच्यासमोर शेवटचा पर्याय”
कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच; कधीही येतो, कधाही जातो- राखी सावंत
वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती, उद्धवजींची मैत्री मोदीजींशी- चंद्रकांत पाटील
संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?- निलेश राणे