अजित पवार मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपाचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा,” अशी मागणी शिवसेनेने सामना संपादकीयमधून केली आहे. याला भाजप नेते निलेश राणे यांनी उत्तर दिलंय आहे
“संजय राऊतांनी कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेले आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संजय राऊतांना अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?? दुसरं, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही, असं निलेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटाली यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर 54 आमदारांच्या स्वाक्षरीचं पत्र चोरल्याचा केला असून यावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.
संज्याने कधीच कोणाची वकिली करू नये. अजित पवारांची वकिली करायला गेला आणि त्यांच्या इज्जतीचा कचरा केला. अजित पवारांनी शपथविधीच्या समर्थनार्थ पत्र चोरलं पण टॉर्च मारला कोणी, हा प्रश्न विचारला मुळात संज्याला अजित पवारांना चोर ठरवायचं होतं का?? दुसर, म्हणे अजित पवार चिरीमिरी खात नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 8, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती, हे त्यांनी आठवावं”
माझ्या खासदारकीला काही धोका नाही- नवनीत राणा
“बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”
मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती; पंतप्रधानांच्या भेटीवरुन नवनीत राणांची टीका