मुंबई : जिल्ह्यात जी वाळू चोरी सुरू आहे, ते कलेक्शन गुलाबराव पाटील यांच्यासाठीच सुरू असेल. वाळू चोरीचे हफ्ते स्थानिक आमदार आणि मंत्र्यांकडे पुरवले जातात. गुलाबराव हे आधी पानटपरी चालवायचे, आता पालकमंत्री आहेत आणि सुपारीचोर आहेत, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका केली होती. यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राणेंनी वांद्रे येथे घर बांधल तेव्हा रेती मीच पाठवली होती आणि मी सुपारीचोर आहे तर त्यांच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती, हे त्यांनी आठवावं, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी निलेश राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच माझा वाळू चोरांशी संबंध असेल तर तो निलेश राणे यांनी सिद्ध करुन दाखवावा, असं आवाहनही गुलाबराव पाटलांनी यावेळी केलं.
महत्वाच्या घडामोडी –
माझ्या खासदारकीला काही धोका नाही- नवनीत राणा
“बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”
मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती; पंतप्रधानांच्या भेटीवरुन नवनीत राणांची टीका