Home महाराष्ट्र माझ्या खासदारकीला काही धोका नाही- नवनीत राणा

माझ्या खासदारकीला काही धोका नाही- नवनीत राणा

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. यावर स्वत: नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आपण उच्च न्यायालयाच्या आदेशाचा पूर्ण आदर करतो. पण उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. इतकंच नाही तर आपल्या खासदारकीला काही धोका होणार नसल्याचा दावाही नवनीत राणा यांनी यावेळी केला. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

दरम्यान, मी संघर्ष करणारी महिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल व तेथे सत्याचाच विजय होईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

“बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना?”

मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती; पंतप्रधानांच्या भेटीवरुन नवनीत राणांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

“नवनीत राणा तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या”