उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि अशोक चव्हाणा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून राज्याशी संबंधित अनेक मुद्दे मांडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी जवळपास दीड तास बैठक सुरु होती. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मी ही गोष्ट कधी लपवलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही, पण याचा अर्थ नातं तुटलं असा नाही. त्यामुळे भेटलो तर त्यात काही चुकीचं नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान, मी काही नवाज शरीफ यांना भेटायला गेलो नव्हतो. माझ्या सहकाऱ्यांना आत्ताही मी पुन्हा जाऊन त्यांना भेटायचं आहे असं सांगितलं तर त्यात चुकीचं काय?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
किती हे असंवेदनशील सरकार; पुण्यातील मुळशी दुर्घटनेवरून भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका
“भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ‘लेटर बॉम्ब’ टाकला, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला”
ठाकरे-मोदी भेटीत मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल- संजय राऊत
दुसरी लाट ओळखताना उशीर झाला, पण तिसरी लाट येऊ द्यायची नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे