Home पुणे किती हे असंवेदनशील सरकार; पुण्यातील मुळशी दुर्घटनेवरून भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

किती हे असंवेदनशील सरकार; पुण्यातील मुळशी दुर्घटनेवरून भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

पुणे : पुणे जिल्ह्यातील मुळशीच्या औद्योगिक वसाहतीत असलेल्या रासायनिक कंपनीला काल भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 18 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला.

ज्या दुर्घटनेत १८ जण होरपळून मेले त्यांना मदत देणे तर सोडा मुख्यमंत्र्यांना साधा शोक व्यक्त करता येत नाही, किती हे असंवेदनशील सरकार., अशी टीका भातखळकर यांनी केली.

पुण्यातील कारखान्यात आगीमुळे जीवित हानी झाली, पंतप्रधानांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला, मदतही जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अद्यापि ही घटना कळलेली दिसत नाही. मदत जाहीर करणे दूर साधा ट्विट ही केलेला नाही., असं म्हणत भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलं.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ‘लेटर बॉम्ब’ टाकला, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला”

ठाकरे-मोदी भेटीत मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल- संजय राऊत

दुसरी लाट ओळखताना उशीर झाला, पण तिसरी लाट येऊ द्यायची नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पंतप्रधानांनी अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना लायकी दाखवली; अतुल भातखळकर यांची नाव न घेता टीका